www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

समुद्रगर्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समुद्रगर्ता (Trench) म्हणजे महासागराच्या किंवा समुद्राच्या तळावरील खोल आणि मोठ्या लांबीची दरी होय. मरियाना गर्ता ही जगातली सार्वात खोल गर्ता आहे.

मरियाना गर्ताच्या सर्वात खोलगट भागाला चॅलेंजर डीप म्हणतात. या गर्तेची खोली ११,०३४ मीटर-३६,२०१ फूट, म्हणजे जवळपास ७ मैल आहे.
मरियाना गर्ताचा आकार अर्धचंद्रकार असून ती बऱ्याच मोठ्या भागावर पसरली आहे.
कोणत्याही मोठ्या नद्या या ठिकाणी काहीही संचयन करत नाहीत.
मरियाना गर्ता हा जगातील एक प्राचीन समुद्र मंच असून त्याचे वय जवळपास १८० कोटी वर्षे आहे.
आजवर या पृथ्वीतलावर केवळ ५७ गर्तांचा शोध लागलेला आहे. त्यापैकी ३२ पॅसिफिक महासागरात, १९ अटलांटिक महासागरात तर ६ हिंदी महासागरात शोधल्या गेल्या आहेत.