www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

Jump to content

गवती लावा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गवती लावा

गवती लावा किंवा पाणलावा (इंग्लिश:Indian Yellowlegged Button Quail; हिंदी:बटन लावा) हा एक पक्षी आहे.

गवती लावा हा आकाराने अंदाजे शहारे लाव्यावढा असतो.मादीला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंद पट्टा असतो.तिची पाय व चोच पिवळी गर्द असते.मादी गुंडूर लाव्यापेक्षा सावकाश उडते.उडताना तिचा नारंगी तांबूस गळपट्टा,पार्श्वभाग,छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो.नराला गळपट्टी नसते.तो रंगाने फिक्कट असतो.गवती लावा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.भारतीय उपखंड,निकोबार आणि अंदमान बेटे या ठिकाणी आढळतो.गवत, झुडपी जंगले आणि शेतीचा प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली