www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

देश
फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
Google

वडेरांची डील १० वर्षांची लूट!

Oct 10, 2014, 01.14PM IST
SHARE
AND
DISCUSS
ashok-khemka


मटा ऑनलाइन वृत्त । चंदीगड

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा जमीन व्यवहारामुळे वादात अडकलेत. 'वडेरांनी केलेला जमीन व्यवहार म्हणजे दहा वर्षांची लूट आहे', असा आरोप आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी केलाय. 'कुठलाही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही, असा अर्थ निवडणूक आयोगाच्या क्लीन चिटचा वडेरांनी काढू नये. निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला नाही, हा आयोगाच्या क्लीन चिटचा अर्थ आहे', असं खेमका म्हणालेत.

'वडेरांनी केलेला जमीन व्यवहार १२ सप्टेंबरपूर्वी झाला होता. आयोगाने हरियाणातील निवडणुकीच्या घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे वडेरांच्या डीलने आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं नाही', असं खेमका यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. वेडरांच्या जमीनीची डील १६ जुलैला झाली होती.

'हुड्डा सरकारने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. या प्रकरणी केंद्रातील भाजप सरकारनेही हरियाणा सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केलीय', असं खेमकांनी सांगितलं.
मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा mtmobile.in वर
आमच्यासोबत राहा
मटा अॅप डाउनलोड करा
times points