www.fgks.org   »   [go: up one dir, main page]

औरंगाबाद + मराठवाडा
फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
Google

रिमोट कंट्रोल व्हायचेय

Oct 10, 2014, 09.27AM IST
SHARE
AND
DISCUSS


पृथ्वीराज चव्हाणांची पंतप्रधानांवर टीका

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडे नेता कोण आहे, हेच सांगू शकत नाहीत. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून कुणी नेता मोठा होऊ द्यायचा नाही. त्यांना महाराष्ट्राचा कारभार रिमोट कंट्रोलने चालवायचा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (९ ऑक्टोबर) येथे केली.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आमखास मैदानावर सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते. ते म्हणाले,'काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत राज्याचा विकास केला. विशेषतः पाच वर्षांत केलेल्या विकासाला समोर घेऊन आम्ही मते मागत आहोत. विकास पुढे सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसला स्पष्ट बहुमत द्या. युतीची सत्ता साडेचार वर्षे होती. त्या काळापासून खंडणी, हप्तेखोरी वाढली. कायदा व सुव्यवस्थेची वाट लागली. उद्योग बाहेर जात होते. ते रोखण्याचे काम काँग्रेसने केले आणि देशात सर्वाधिक ताकदीची अर्थव्यवस्था निर्माण केली. सर्व घटकांना न्याय दिला. भाजपकडे राज्यात नेता कोण हेच माहित नाही. मोदींना रिमोट कंट्रोलने महाराष्ट्र चालवायचा आहे.' प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, की काँग्रेसने राज्याचा विकास केला. युतीच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. राज्यात काँग्रेस मजबूत आहे. आम्हालाच स्पष्ट बहुमत येईल.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू असा विश्वास आहे. धर्मांध शक्तींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसलाच साथ द्या, या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातून काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून येतील.

महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र जोशी यांचीही यावेळी भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कदीर मौलाना, तीन नगरसेवक, सुरजितसिंग खुंगर यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस अरूण मुगदिया यांनी सू्त्रसंचालन केले. आमदार सुभाष झांबड यांनी आभार मानले.
मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा mtmobile.in वर
आमच्यासोबत राहा
मटा अॅप डाउनलोड करा
times points